विजेची तार तुटून अंगावर पडली; शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू.

बीड दि.25 अॉगस्ट – सोयाबीन पिकावर औषध फवारणी करताना अचानक विजेची तार तुटून अंगावर पडल्याने शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आहेर धानोरा येथे घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

(The electric wire broke and fell on the limbs; Death of a farmer working in the field.)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड (Beed) तालुक्यातील आहेर धानोरा येथील विनायक कानोजी फाटक (वय 39) हे शेतकरी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात सोयाबीनवर औषध फवारणी (Drug spraying) करत होते. आपल्या कामात मग्न असलेल्या शेतकऱ्याचा यावेळी घात (Death of farmer) झाला.

यावेळी शेतातून गेलेली विद्युत तार (Electric wire) अचानक विनायक कानोजी फाटक यांच्या अंगावर तुटून पडली. यामुळे त्यांना विजेचा जबर शॉक बसला. यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!