अनलॉक नंतरचा पहिला संपूर्ण लॉकडाऊन अमरावतीत…. मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

अमरावती: दि.२१- अमरावतीत उद्यापासून आठवडाभराचा संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी (२२ फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवडाभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असणार आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. “सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या १.६ टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवाव्या लागणार असल्याचे यावेळी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
(The first complete lockdown after unlock in Amravati…. Minister Yashomati Thakur’s announcement)
अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी सांगितलं. “स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. याकाळात कुणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम करायचं ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल”, असं त्यांनी सांगितलं. “आम्ही सगळ्यांकडून मदत मागत आहोत. नगरसेवकांकडेही मदत मागितली आहे. अमरावती आणि अचलपूर महापालिका यांचीही मदत मागितली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात १२ कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. या १२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
अमरावती मनपा हद्दीत सध्या २७८३ कोरोना पॉझिटीव्ह (corona positive) रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. अमरावती जिल्ह्यात आज तब्बल ७२७ नवीन रुग्ण पॉझिटीव्ह (corona positive) आढळून आले आहेत. आज २१३१ रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ३४.११ टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati).
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. ३५९ रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधिकार्यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. अनलॉक नंतर होत असलेला हा पहिला संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) असून आठवडा भरासाठी लोकांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात सध्या कोरोना (corona) आकडेवारीत मोठी वाढ होत असून संपूर्ण राज्यात खबरदारी घेतली जात आहे.