शेतकऱ्यांनो सावधान…कापसाच्या वाणात बनवाबनवी? शेतकऱ्याने रागात उपटून टाकले कापुस;

कापुस आठ फुट मात्र एकही बोंड नाही; शेतकऱ्यांवर कापुस उपटण्याची वेळ

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) तालुक्यातील आसोला येथील गरीब शेतकरी नारायण चोले यांनी शेतात कापुस 4708 या वाणाचा seed लागवड केली. मशागतीमुळे कापूस cotton आठ ते दहा फूट उंचीचा झाला पण बोंडे काहीच लागली नाहीत त्यामुळे हताश होऊन कापूस उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून हा प्रकार बोगस बॅगचा कि अति पावसाचा हा प्रश्न पडला आहे. मात्र सदरील कुटूंबावर यामुळे मोठे संकट कोसळले असल्याचे दिसत आहे.

धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापुस cotton पिक घेतले जाते. यामुळे याभागात नेहमीच कापसाच्या विविध जातीच्या वाणाबाबत विविध कंपन्या जाहिराती करुन शेतकऱ्यांना हेच वाण घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. तालुक्यातील आसोला येथील अल्पभुधारक शेतकऱ्यांला मात्र यंदा चांगलाच फटका बसला. आसोला येथील शेतकरी नारायण जयवंतराव चोले यांनी आपल्या दिड एकर शेतात कापसाचे 4708 या वाणाचा seed लागवड केली. चांगला पाऊस झाल्याने कापुसाची वाढ भरपुर झाली. जवळपास आठ ते दहा फुटापर्यंत कापुस cotton वाढला मात्र एकही बोंड झाडावर नसल्याने चोले हतबल झाले. हाती एक छटाक ही कापूस पडत नसल्याचे पाहून शेतकऱ्याने कापुस काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सध्या सदरील शेतकरी खुप संकटात आहे. नारायण चोले यांच्या कुटूंबात पत्नीसह एक मुलगी व मुलगा असुन मुलगी वैद्यकीय शिक्षण तर मुलगा बारावीत शिकत आहे. कापसाची वाढ दहाफुटापर्यंत गेली मात्र एकही बोंड नसल्याचे कारण अद्याप स्पष्ट होत नाही. सदरील पिकासाठी शेतकऱ्यांला लाखापर्यंतचे उत्पन्न अपेक्षित असताना पदरी निराशा पडली असुन सात वेळा फवारणीसह जवळपास पंचेवीस हजार रुपयांचा खर्च सहन करावा लागत आहे. याबाबत तालुका कृषि अधिकाऱ्याशी संपर्क होवू शकला नाही. हताश झालेल्या शेतकऱ्यांस शासनाने पंचनामा करुन मदत करण्याची मागणी होत आहे.

Farmers beware ... should we make cotton varieties? The farmer angrily uprooted the cotton;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!