मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू.

मानवत दि.12 सप्टेंबर – तालुक्यातील केकरजवळा येथे पाथरी पोखरणी रस्त्यावर 12 सप्टेंबर रोजी पहाटे 4:15 वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.
(The four who went to the Morning Walk were crushed by the vehicle; Both died on the spot.)
मानवत तालुक्यातील केकर जवळा येथील चौघे दररोज प्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी (Morning walk) गेले. या चौघात उत्तमराव नामदेव लाडाने (वय 5), आत्माराम भीमराव लाडाने (वय 42), नंदकिशोर साहेबराव लाडाने (वय 50), राधेश्याम रामभाऊ लाडाने (वय 48) यांचा समावेश आहे.
यावेळी अज्ञात वाहनाने चौघांनाही जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) उत्तमराव नामदेव लाडाने (वय 5) व आत्माराम भीमराव लाडाने (वय 42) ठार जागीच ठार झाले. तर नंदकिशोर साहेबराव लाडाने (वय 50), राधेश्याम रामभाऊ लाडाने (वय 48) हे दोघे गंभीर जखमी झाले.
जखमींना तात्काळ परभणी (Parbhani) येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मानवत पोलिसांना (Police) मिळताच पोलिस निरिक्षक (Police Inspector) सुभाष राठोड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.