राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग बस व ट्रकचा थरार; दहा जखमी.

अकोला दि.6 अॉक्टोंबर – राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक 6 खामगाव अकोला रोडवरील शेळद फाट्या जवळ ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज (दि.6) दुपारी घडली आहे. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या अपघातात दहा प्रवाशी जखमी झाले असून बस चालक गंभीर जखमी आहे.

(Tremors of burning bus and trucks on national highways; Ten wounded.)

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 खामगाव अकोला रोडवरील शेळद फाट्या दुपारी अपघात जवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी (Police) घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसने पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिकांकडून मदत आणि बचावकार्य करण्यात आले.

बुलडाणा (Buldhana) आगाराची बुलडाणा-नागपूर ही एमएच-40-एक्यू 6160 क्रमांकाची बस सकाळी 10:45 वाजता नागपूरसाठी निघाली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास या बसची (Bus) आणि कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची (Truck) (युपी-70-जीझेड-0515) समोरा समोर धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर बस व ट्रकने पेट घेतला. या अपघातामध्ये बस जळून खाक झाली. या अपघातामध्ये बसमधील 7 प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांच्यावर अकोला (Akola) येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यावेळी बाळापूर पोलिसांचे एक वाहन अकोला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खिरपूरी देवगाव येथे पोलिस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्तासाठी जात होते. या दरम्यानच बस व ट्रकची धडक होऊन अपघात झाला. बसने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांनी तेथे धाव घेत बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या अपघातामध्ये बस चालक एन. टी. लहाने (रा. बुलडाणा) यांना अधिक मार लागला असल्याचे स्थानिकंचे म्हणणे आहे. दरम्यान या बसवर वाहक म्हणून जे. बी. साळवे हे होते. बस चालकासह बसमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमींची नावे मात्र कळू शकली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!