बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली; पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी .

बीड दि.18 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 589 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 17 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 572 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सात तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-4, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-1, केज-0, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आटोक्यात आली असताना गेल्या दोन दिवसात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ दिसत आहे. मंगळवारी 12, बुधवारी 11 तर आज 17 रुग्ण आढळून आली आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार मंगळवारी 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2818 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 64 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 1,003 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1,052 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील 64 लाख 70 हजार 791 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. बुधवारी 32 मृत्यूची नोंद झाली.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 66 लाख 26 हजार 875 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 11 हजार 766 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!