हैदराबाद महापालिका त्रिशंकू; एमआयएम किंगमेकरच्या भुमिकेत

हैदराबाद दि.५- ग्रेटर हैदराबादच्या (Hyderabad) महानगरपालिका निवडणुकीचे सर्व निकाल घोषित झाले असुन महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. ४४ जागा कायम राखत ‘एमआयएम’ (AIMIM) पक्ष ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीला (TRS) (टीआरएस) सर्वाधिक ५५ जागा मिळाल्या आहेत.
हैदराबाद (Hyderabad) महापालिका निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला अर्थात टीआरएसला (TRS) ५५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजपने (BJP) ४८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. एमआयएम (AIMIM) पक्ष ४४ जागांसह तिसऱ्या स्थानी आहे. या सगळ्यात काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत केवळ ४ जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपने (BJP) यावेळी जोरदार मुसंडी मारत ४८ जागांवर विजय प्राप्त केला आहे. १५० सदस्य संख्या असलेल्या हैद्राबाद (Hyderabad) महापालिकेत बहुमतासाठी ७६ सदस्यांची गरज आहे. आलेल्या निकालावरुन महापालिकेची त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या निवडणूकीत ९९ जागा घेवून निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या टिआरएसला (TRS) ५५ जागावर समाधान मानावे लागले. आगामी काळात टिआरएस (TRS) व एआयएमआयएम (AIMIM) एकत्रित सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.