मारेकऱ्यांत धारुरच्या आरोपीचा समावेश; पोलिसांनी ‘त्या’ खूनातील तीघांच्या मुसक्या आवळल्या.

केज दि.15 एप्रिल – माझ्या सोबत मुलीचे लग्न लावून का देत म्हणून धमकी देत लग्नाला नकार देणाऱ्या मुलीच्या पित्यावर हल्ला करुन फरार झालेले खूनातील (Murder) आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या खूनामुळे केज (Kaij) तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी (Police) तीघांना पुणे येथून मुसक्या आवळ्या असून यात धारुर (Dharur) तालुक्यातील एका आरोपीचा समावेश आहे.
लातूर (Latur) येथे उपचार सुरु असताना गंभीर जखमी रमेश नेहरकर यांचे निधन झाले होते. यानंतर फरार आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून जवळजवळ दोनशेचे जमाव ठाण्यात जमला होता. यावेळी पोलिसांनी नातेवाईकांना तात्काळ आरोपी ताब्यात घेण्यात येतील असे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला होता. काल पोलीसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना पुणे (वाघोली) येथून अटक केली.
काय आहे घटना…
मुलीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या पिता रमेश एकनाथ नेहरकर ( वय 42 वर्ष ) रा. धारूर रोड, केज हा केज ते कळंब रोडने मोटार सायकल वरून येत असताना आरोपींनी संगनमत करून (दि.9 एप्रिल) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रोडवर साळेगाव शिवारात शेख फरीद बाबा दर्ग्या जवळ असलेल्या संत सेना महाराज यांच्या मंदिरा जवळ हल्ला करुन डोक्यात लोखंडी रॉड ने मारून गंभीर जखमी केले. नेहरकर यांचेवर लातूर येथे एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना ( दि.11 ) एप्रिल रोजी मृत्यू झाला.
रमेश याच्या मृत्यू नंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police in charge) सुनिल लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या तपासी अंमलदार यांना सूचना दिल्या.
असा लावला सापळा…
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे (Cyber cell) पोलीस नाईक अनिल मंदे यांनी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शंकर वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांची टीम आरोपींचा शोध कामी विविध ठिकाणी रवाना झाले होते. घटना घडतात आरोपी हे झाशी येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. आरोपींचे मोबाईलचे टॉवर लोकेशनवरून आरोपी हे केज वरून पुणे, झाशी उत्तर प्रदेश या मार्गे परत पुणे येथे येत असल्याची माहिती मिळताच त्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्याची खात्री होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मिसळे, त्यांच्या पथकातील अनिल मंदे व दिलीप गित्ते यांनी तात्काळ पुणे येथे जाऊन गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना वाघोली पुणे येथून अटक केली आहे.
अत्यंत संवेदनशील असलेल्या या घटनेतील मुख्य आरोपी भागवत संदिपान चाटे रा. तांबवा ता. केज व त्याचे इतर दोन साथीदार अनुक्रमे शिवशंकर हरिभाऊ इंगळे रा इंगळे वस्ती केज आणि रामेश्वर नारायण लंगे रा. जहागीर मोहा ता. धारूर यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं 114/2022 भा दं वि 302 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला असून प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.
( The killers include Dharur’s accused; Police caught a glimpse of the ‘three’ murderers. )