धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पुढार्‍याचा थयथयाट; शहरात ठरतेय चर्चेचा विषय.

किल्ले धारूर दि.25 फेब्रुवारी – राज्यभरात नोकर भरती घोटाळा गाजत असताना आता धारूरमध्येही नोकरीभरती प्रकरणावरून वडवणीच्या एका पुढार्‍याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलाच राडा केल्याची चर्चा शहरात गेल्या दोन दिवसांपासून होत आहे.

( The leader of the Dharur Agricultural Produce Market Committee; A topic of discussion in the city. )

मिळालेल्या माहितीनुसार धारूर (Dharur) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ( Dharur Agricultural Produce Market Committee) दोन जागांची भरती एका एजन्सीकडून करण्यात आली. या एजन्सीने पारदर्शक पध्दतीने जागा भरून मेरिटनुसार उमेदवार निवडले. मात्र हीच बाब कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व करणार्‍या एका पुढार्‍याला चांगलीच खटकली.

या जागेसाठीचा आपण ठरवलेला उमेदवार घेतला नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. ऐनवेळी मी सांगितलेले उमेदवार न घेता माझ्या परस्पर दुसरे उमेदवार कसे काय निवडले असे म्हणत या पुढार्‍याने येथील कार्यालयात तुफान राडा घातला. सभापती उपसभापतीना फैलावर घेवून आमची गरज तुम्हांला नाही असे सुनावले. त्यामुळे या पुढार्‍याने बाजार समितीत लावलेला आपला फोटो देखील काढून नेला. झालेला सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाल्याने सर्वत्र चर्चेला पेव फुटले आहे.

आधीच राज्यात पेपरफुटी आणि बोगस परिक्षा घेण्यावरून वादंग उठलेले होते. त्यामुळे कंत्राट मिळालेली कंपनी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नव्हती. या दोन जागा भरण्यासाठी पुढार्‍यांमध्ये मिलीभगत झाली खरी परंतु कंपनीने त्यांना चांगलेच तोंडघशी पाडले. परंतु या सगळ्या प्रकारात दोन गरीब मुलांचं नशिब उजाडलं असून त्यांना दैवानेच साथ दिली म्हणावे लागेल.

याप्रकाराची गेल्या दोन तीन दिवसांपासून शहरात चांगलीच चर्चा होत आहे. यामुळे मात्र कृषि उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी मंडळीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आगामी काळात तोंडावर आलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत याचा फटका सत्ताधारी भाजपला बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

फोटो काढणारे नेते कोण?
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात लावलेला आपला फोटो काढणारे नेते म्हणजे वडवणीचे राजाभाऊ मुंडे हे भाजपाचे बडे नेते आहेत. कृषि उत्पन्न बाजार समिती कामकाजात विचारात घेतले जात नसल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!