कोरोंना विशेष

लस घेणाऱ्यांनो सावधान… जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता.

नवी दिल्ली दि.27 जून – कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हॅरिएंट (Delta variant) आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी हा आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य प्रकार असल्याचे सांगितले आहे. चिंतेची बाब म्हणजे डेल्टा व्हॅरिएंट लसीकरण (Vacccination) झालेल्यांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. त्यामुळे WHO च्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे.

(Beware of vaccinators … WHO chief expresses concern.)

जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत टेड्रोस अधानोम म्हणाले की, ‘डेल्टा हा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे ज्याने सुमारे 85 देशांना वेढले आहे. एवढेच नाही तर हा डेल्टा व्हॅरिएंट (Delta variant) लस घेतलेल्या (vaccinators) लोकांना देखील वेगाने संक्रमित करत आहे. यामुळे लस घेणाऱ्यांनाही कोविड नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी लागणार आहे. अनेक जण लस घेतल्यानंतर बिनधास्त वागत असल्याचे दिसुन येते.

डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे की जेव्हा आपण कोरोनाचे निर्बंध शिथिल करतो, आणि सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टीकडे लक्ष देणं कमी करतो, तेव्हा जगभरात कोरोना संसर्गाची (Corona infection) प्रकरणे झपाट्याने वाढू लागतात. ते पुढे म्हणाले की संसर्गाची गती वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार वाढू लागतात. आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडतो. या कारणांमुळे देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढते.

नवीन कोरोना व्हॅरिएंट तयार होण्याची शक्यता जास्त आहे आणि ते सतत नोंदवले जात आहेत. व्हायरसच्या बाबतीत हे होत असतं. ते स्वतःच विकसित होत राहतात. परंतु आपण यावर ब्रेक लावून व्हेरिएंट विकसित करण्याची प्रक्रिया थांबवू शकतो.

डेल्टा हा कोरोनाचा एक अतिशय धोकादायक प्रकार आहे आणि अल्फा प्रकारापेक्षा हा जास्त संसर्गजन्य आहे, जो युरोपसह जगातील बर्‍याच देशांमध्ये पसरला होता. त्याची प्रकरणे जगभरात झपाट्याने समोर येत आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा व्हॅरिएंटमुळे संक्रमित (Corona infection) झालेल्या कोरोना रूग्णांमध्ये ऐकायला येणे कमी होणे, ओटीपोटाचा त्रास, रक्ताच्या गुठळ्या होणे, गॅंग्रिन या सारखी लक्षणे दिसून येत आहेत. आत्तापर्यंत ही लक्षणे कोरोना रूग्णांमध्ये सामान्यत: दिसून येत नव्हती. यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!