रविवारी धुमाकूळ घालणारा बिबट्या आज…

बीडः दि.३०(प्रतिनिधी) रविवारी आष्टी (Ashti) तालुक्यातील वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालून पाच ठिकाणी हल्ले करणारा बिबट्या (Leopard) आज सोमवारी मात्र आढळून आलेला नाही. बिबट्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांसह जिल्ह्यातील वन कर्मचारी (Forest Department) व बाहेरुन आलेले वन्य जीव व्यवस्थापन (Wildlife Management) तज्ञ कर्मचारी व अधिकारी तळ ठोकून आहेत. आज दिवसभर मात्र बिबट्याच्या हल्ल्याचा प्रकार किंवा दिसुन आल्याची घटना कोठेही घडली नाही. यामुळे बिबट्याने अखेर इतर ठिकाणी पळ काढला की काय असा प्रश्न पडला आहे.
काल दि.२९ रविवारी बिबट्याने (Leopard) आष्टी (Ashti) तालुक्यातील पारगाव येथील दोन हल्ले करुन एका महिलेचा बळी घेतला होता. यानंतर गहुखेल येथे शेळीची शिकार करुन दोन मुलांवर चाल केली, सुरडी येथेही एका शेतकऱ्यावर हल्ला केला तर पांडुळगव्हाण येथेही एका शेतकऱ्यावर हल्ला केला. दिवसभर पाच हल्ले करुन एका महिलेसह शेळीची शिकार करणारा बिबट्या (Leopard) आज मात्र आढळून आला नाही. सुरडी, किन्ही, मंगरूळ, पारगाव जो.,गहुखेल, येथे मानव तसेच जनावरांवर हल्ला केलेल्या बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या (Forest Department) एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून त्यामध्ये औरंगाबाद, अमरावती, नांदेड, बीड जिल्ह्यातील सर्व वनविभाग, पुणे येथील रेस्क्यू ॲनिमल पथक, चार वन्यजीव व्यवस्थापना (Wildlife Management) मधील तज्ञ अशा टीमचा ही समावेश आहे. वनविभाग कर्मचारी आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी आठ पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत.