बीड जिल्ह्यात चक्क नगराध्यक्ष करणार उपोषण; नगर पालिकेच्याच थकीत अनूदानासाठी उचलले पाऊल.

माजलगाव दि.24 जानेवारी – बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव येथील नगर पालिकेचे मावळते नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) अनुदानासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी व पालिकेचे प्रशासक (Administrator) यांच्याकडे देण्यात आले आहे.

(The mayor will go on a hunger strike; Steps taken for the tired grant of the municipality itself.)

माजलगाव (Majalgoan) येथील नगर पालिकेचे मावळते नगराध्यक्ष (mayor) शेख मंजुर यांच्या कार्यकाळात शहरातील शेकडो गरीब बेघर नागरीकांची प्रधानमंत्री आवास योजनेतुन घरे मंजुर केली. काही अनुदान वितरित केले. मात्र तांत्रिकबाबी मुळे रखडलेले अनुदान शासनाने परत मागितले.

शेख मंजुर यांनी शासनाकडुन ते अनुदान परत घेतले व घरकुल लाभार्थीला तात्काळ वाटप करण्यात येण्याची मागणी केली. घरकुलाचे अनुदान मिळत नसल्याने थेट उपविभागिय अधिकारी तथा नगर पालिका प्रशासक यांच्या कार्यालया समोर 31 जानेवारीला उपोषण (hunger strike) करण्याचा इशारा नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी दिला आहे.

आपल्या निवेदनात म्हटले आहे, की माझ्या कार्यकळात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थांच्या हप्त्यांचे वाटप प्रगती पथावर होते. त्यानंतर पी.एफ.एम.एस. सिस्टिम बंद झाली. त्यामुळे निधि तसाच राहिला. शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेचा अखर्चित निधी पालिकेकडुन परत मागितला. तो निधी शासनाकडुन परत आणण्यासाठी शेख मंजुर यांनी पाठपुरावा केला. तो निधी परत आला असतांना नगर पालिका प्रशासक वाटपास टाळाटाळ करत आहेत.

वास्तविक पाहता नगराध्यक्ष शेख यांच्या कार्यकाळात पाहिल्या हप्त्यासाठी 90 लाभार्थी व दुसऱ्या हप्त्यासाठी 190 लाभार्थी तर तिसऱ्या हप्त्यासाठी 60 लाभार्थी वंचित राहिले आहेत. सदरील लाभार्थी हे आर्थिक गरीब आहेत. सदरील आर्धवट बांधकामा मुळे त्यांचे संसार उघड्यावर आहेत.

शासनाकडुन आलेला निधी संबधित लाभार्थी यांना दि.30 जानेवारी पासुन वाटप न झाल्यास नगर पालिका प्रशासक तथा उपविभागिय अधिकारी निलम बाफना यांच्या कार्यालया समोर दि.31 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याचा ईशारा जिल्हाधिकारी यांना दिला आहे. त्या अनुषंगाने सदरील उपोषणाचे निवेदन नगराध्यक्ष शेख मंजुर व माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे यांनी दिले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!