धक्कादायक … बँकेच्या रांगेत उभ्या शेतकऱ्याचा मृत्यू; पैसे मिळाले पण जीव गेला.

परभणी दि.8 जून – परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Bank) रांगेत (queue) तब्बल अडीच तास उभे राहून पैसे काढणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे.

(Shocking … Death of a farmer standing in the bank queue; Got money but died.)

सुदाम कांबळे असे मृत्यू पावलेल्या या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ते बँकेतून (Bank) पैसे काढल्या नंतर घरी जात असताना त्यांना चक्कर आली. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. बँकेच्या ढिसाळ, आणि निष्क्रिय कार्यप्रणालीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सध्या सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. हातातील काम गेल्याने अनेकांना बँकेच्या शिलकीवर आपली उपजिवीका भागवावी लागत आहे. शेतकऱ्यांनाही बँकेत (Bank) जमा झालेल्या अनुदान व खात्यावरील जमा रकमेचा आधार मिळत आहे. मात्र अशाच एका शेतकऱ्याला बँकेच्या रांगेत (queue) तासनतास उभे राहिल्यामुळे आपला जीव गमवावा लागला.

तालुक्यातील परभणी मध्यवर्ती बँकेच्या (District Bank) सर्वच शाखेत शेतकरी (Farmer) वर्ग मोठ्या संख्येने खातेदार आहेत. बॅंकेच्या ढिसाळ कारभार आणि नियोजन शून्य व्यवहाराबाबतीत खातेदारांकडून अनेक वेळा तक्रारी येत असतात.

जिल्ह्यात कोविड-१९ (Covid-19) चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी बँक व्यस्थापनाकडून म्हणावे तसे नियोजन असल्याचे दिसत नाही. खातेदारांना पैसे काढण्यासाठी नेहमीच वेठीस धरून ठेवत असल्याने बँक व्यवस्थापनावर रोष व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!