केज तालुक्यातील खूनाचा छडा लागला; बापानेच केला पोटच्या मुलाचा घात.

केज दि.21 अॉक्टोंबर – केज (Kaij) तालुक्यातील दैठणा येथे विलास बबन मुळे (38) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सदरील प्रकार घातपात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने केज पोलिसांनी शिघ्रगतीने तपास करत अवघ्या काही तासात मुलाचा मारेकरी असलेल्या बापाला बेड्या घातल्या.
(The murder in Kaij taluka began; The father himself killed the son.)
केज तालुक्यात सध्या गंभीर गुन्ह्यांत वाढ दिसून येत आहे. काही दिवसांत अल्पवयीन मुलींच्या शोषणासह खुन, बलात्कार (Rape) सारखे गुन्हे घडली आहेत. यातच आज विलास बबन मुळे यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून मृत व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून येत असल्याने सदरील प्रकार हा खूनाचा (Murder) असल्याचा संशय होता. केज पोलिसांनी यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली.
सदर घटनेची माहिती मिळताच केजचे पोलीस (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मृतावर अंत्यसंस्कार होताच अप्पर पोलीस अधीक्षक सविता नेरकर, केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) शंकर वाघमोडे, पोलिस उपनिरिक्षक (PSI) दादासाहेब सिद्धे यांच्या पथकाने अवघ्या काही तासात गुन्हेगार शोधला.
नातेवाईका सोबत भांडणं करण्याच्या रागातून मयताचा बाप चंद्रकांत उद्धव मुळे याने वैतागून धारदार शस्त्र डोक्यात मारून खून केल्याची कबुली दिली. खून करून प्रेत शाळे जवळून स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात टाकल्याचे यावेळी त्याने पोलिसांना सांगितले. केज पोलिसांनी तपासात दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे कौतूक होत आहे.