त्या मुलाचा खुन ‘करणी’ च्या प्रकारातून…. पोलिस तपासात झाले निष्पन्न

बीडः दि.४(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील नेकनुर येथे काल एका सहा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांचा गळा दाबुन खुन (Murder) केल्याची घटना घडली होती. सदरील खुन हा ‘करणी’ च्या प्रकारातून झाल्याचे पोलिस (Police) तपासात निष्पन्न झाले.

नेकनुर जवळ असलेल्या रत्नागिरी येथे शुभम सपकाळ या ६ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी कुटूंबियांनी घातपाताचा अंदाज वर्तवला होता. सहाय्यक पोलिस (Police) निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी जलद गतीने तपास करुन सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ यांना ताब्यात घेतले. या दोघांनीही जुन्या वादातून शुभमचा खून (Murder) केल्याचे कबुल केले. या जबाबात त्यांनी आमच्या म्हशीला करणी करुन त्यांनी ठार मारले होते म्हणून त्याचा बदला घेतल्याचे आरोपीनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!