BEED24

केंद्रेवाडीच्या आवाजाचे गुढ उकलले; हे आहे कारण…

अंबाजोगाई दि.9 सप्टेंबर – अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारी (दि.6) भूगर्भातून गूढ (mystery) आवाज येऊ लागले होते. यामुळे बीड येथील भूगर्भ तज्ञांनी (Geologists) मंगळवारी (दि.7) केंद्रेवाडी गावास भेट देऊन परिसराची पाहणी केली. पाणीपातळी वाढल्याने हवेचा दाब निर्माण होऊन ती हवा कोरड्या बोअर मधून बाहेर पडताना आवाज होतो. असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

(The mystery of Kendrawadi’s voice was solved; This is because …)

अंबाजोगाई आडस रोडवर असलेल्या केंद्रेवाडी या गावात सोमवारी दुपारपासून भूगर्भातून गुढ आवाज येऊ लागले होते. यामुळे भयभीत झालेले नागरिक भूकंप (Earthquake) होतो की काय या धास्तीने सोमवारी रात्रभर जागी राहील. गुढ आवाजाबाबत गावच्या सरपंच सौ. योगिता बालासाहेब केंद्रे व तलाठी सौ. माधुरी स्वामी यांनी ही बाब तहसीलदार विपीन पाटील यांना कळवली.

याची तातडीनं दखल घेत तहसीलदार (Tehsildar) यांनी बीड (Beed) येथील भूगर्भ तज्ञांना पाचारण केले. बीड येथील भूगर्भ तज्ञ सौ. गडेकर या केंद्रेवाडी गावात हजर झाल्या. यावेळी त्यांनी गावाच्या बाजूला असलेला तलाव जो नुकत्याच पावसात तूडूंब भरला आहे. त्याची पाहणी केली. तसेच परिसरातील काही भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गावच्या तलाठी सौ. माधुरी, स्वामी सामाजिक कार्यकर्ते अभय केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव तरकसे, रामेश्वर केंद्रे, विष्णू केंद्रे, विजय केंद्रे, गोविंद केंद्रे उपस्थित होते.

पाणीपातळी वाढल्याने गुढ आवाज
पाण्याची पातळी वाढल्याने जमिनीमध्ये हवेचा दाब निर्माण होतो. या हवेला बाहेर येण्यासाठी वाव नसल्यामुळे ज्या ठिकाणी कोरडे बोअर आहे, त्या ठिकाणाहून हवा वेगाने बाहेर पडते त्यामुळे आवाज होतो असा अंदाज भूगर्भ तज्ञ सौ. गडेकर यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केला. होणारा आवाज भूकंपाचा नाही असे त्याने सांगितले. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती पाठवून याबाबतीत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळताच त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगीतले.

उपजिल्हाधिकारी यांची भेट
गावात होत असलेल्या भूगर्भातील गुढ आवाजाने नागरिक भयभीत झाले होते. गावात होत असलेल्या गुढ आवाजाची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) शरद झाडके यांनी गावास भेट दिली यावेळी त्यांनी येणाऱ्या गुढ आवाजा संदर्भात नागरिकांशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडगे यांच्यासोबत तहसीलदार विपिन पाटील, तलाठी सौ. माधुरी स्वामी उपस्थित होते.

 

Exit mobile version