वैद्यनाथ बँकेला गालबोट; आशोक जैन यांना लाच स्विकारताना अटक

परळीः– दि.१९- जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक मिळवलेल्या वैद्यनाथ बँकेला आज मोठे गालबोट लागले असून बँकेच्या चेअरमन असलेल्या आशोक जैन यांना एका प्रकरणात पंधरा लाख रुपयांच्या लाचे पैकी दहा लाख रक्कम घेत असताना औरंगाबाद लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

असा रचला सापळा

▶️ युनिट- औरंगाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-48, व्यवसाय – किराणा दुकान व शेती
▶️ आरोपी श्री.अशोक पन्नालाल जैन, वय- 52, व्यवसाय – व्यापार तथा चेअरमन, द वैद्यनाथ अर्बन बँक.
▶️ लाचेची मागणी- 15,000,00/- रूपये.
▶️ लाच स्विकारली- 10,000,00/- रुपये.
▶️ हस्तगत रक्कम- 10,000,00/- रूपये.
▶️लाचेची मागणी पडताळणी –
दिनांक 29.09.2020 व
दिनांक 10.10.2020 रोजी
▶️लाचेचे स्वीकृती
दिनांक 19.10.2020 रोजी
▶️ कारण – तक्रारदार यांचे सन 2018 मध्ये सी सी अकाउंट चे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे रु. 15,000,00/- मागणी करून, रु.10,000,00/- ही प्रत्यक्ष स्वीकारून उर्वरित रू.5,000,00/- नंतर घेण्याचे सांगितले , आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
▶️ सापळा अधिकारी-श्री. गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.
औरंगाबाद. श्री पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, पोशि. विलास चव्हाण, चागंदेव बागुल, ला. प्र. वि. औरंगाबाद
▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, मा.डाॅ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद.

या घटनेमुळे वैद्यनाथ बँकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यापुर्वीही नोटबंदीच्या काळात खा. प्रितमताई मुंडे वैद्यनाथ बँकेच्या नोट बदली प्रसंगी चर्चेत होत्या. जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक असलेल्या दि वैद्यनाथ अर्बन बँक पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!