बीड जिल्ह्याची संख्या ७७… अशी आहे तालुका निहाय आकडेवारी…

बीडः-२७ फेब्रुवारी- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ७७९ प्राप्त अहवाला पैकी फक्त ७७ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७०२ जन निगेटिव्ह आली आहेत आज सर्वाधिक ३४ कोरोना रुग्ण गेवराई तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(The number of Beed district is 77 … This is the taluka wise statistics …)

१. बीड- ११                 ७.माजलगाव-३
२. अंबाजोगाई-१५        ८.परळी-१
३. आष्टी-६                   ९.पाटोदा-०
४. धारुर-०                 १०.शिरुर-१
५. गेवराई-३४             ११.वडवणी-०
६. केज-६

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.२७ शनिवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात काल गेवराई तालुक्यात एका आश्रमात तब्बल २९ कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळून आले होते. यामुळे आरोग्य विभागाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना (corona) रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात शुक्रवारी पुन्हा कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा ८ हजाराच्यावर गेला आहे. शुक्रवारी एकुण ८ हजार ३३३ नवीन रुग्ण आढळले तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!