दुचाकी चोरीत धारुर व पाथरीतून दोघांना अटक; गांवदरा येथे स्कार्पिओची दुचाकीला धडक.

बीड दि.10 जुलै – एका दुचाकी चोरीचा उलगडा केल्यानंतर दिंद्रुड पोलिसांनी (Police) दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. नितीन वसंत मुंडे (रा.पहाडी दहिफळ ता.धारूर ) व गणेश काशिनाथ गायकवाड ( रा.पाथरी जि.परभणी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

(Two arrested for stealing two-wheeler Scorpio hits two-wheeler at village.)

गेल्या कांही दिवसांपासून दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर (Police) आव्हान होते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तेलगाव येथील एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या घटनेची दिंद्रुड पोलीसांनी गंभीरतेने दखल घेत तपास सुरु केला. पोलिसांनी काही तासांमध्ये दुचाकीसह गणेश काशिनाथ गायकवाड या चोरास अटक केली. चौकशीनंतर त्याने दुचाकी चोरीत आणखी काही साथीदार असल्याचे सांगितले. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) राजा रामस्वामी, डीवायएसपी जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रभा पुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त केल्या.

सदरील प्रकरणात पोलिसांनी वडवणी येथून अन्य एक आरोपी नितीन वसंत मुंडे यास शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) प्रभा पुंडगे, पीएसआय (PSI) विठ्ठल शिंदे, अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड, सरवदे, संजय मुंडे आदी कर्मचाऱ्यांनी केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून इतर दुचाकी चोरींचा उलगडा यातून होण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरु आहे. यातून परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येतील. तसेच दुचाकी चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) प्रभा पुंडगे यांनी दिली.

गावंदरा येथे दुचाकी व स्कॉर्पिओचा अपघात;

किल्लेधारूर – खामगाव पंढरपूर सांगोला राष्ट्रीय महामार्गावर गावंदरा येथे मोटर सायकल व स्कॉर्पिओ चा अपघात (Accident) शनिवारी सायंकाळी घडला. या अपघातात गावंदरा येथील एक तरुण गंभीर जखमी झाला. जखमीस बीड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

युवराज आघाव व त्यांच्या पत्नी मंदाकिनी आघाव, मनिषा नानाभाऊ दराडे सर्व राहणार गावंदरा ही जखमींची नावे असून मोटार सायकल सीबीझेड एम एच 44 ए 9002 ने घराकडे परतत असताना खामगाव सांगोला महामार्गावर केज कडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक एम एच 44 जी 2220 ने मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात (Accident) युवराज आघाव गंभीर जखमी झाले असून बीड येथील रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्कार्पिओ चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!