कोरोंना विशेष

धारुरच्या कोरोना बळींची संख्या वाढली…. पहा सविस्तर…

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) तालुक्यातील आसोला येथील कोरोनाग्रस्त ७० वर्षीय वृध्देचे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना काल दि.१३ मंगळवार रोजी पहाटे १.३० वाजता निधन झाले. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना (Corona) बळीत धारुरचा हा अठरावा बळी (Death) ठरला आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. धारुर शहर व तालुक्यातही कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील आसोला येथील एक ७० वर्षीय वृध्द महिला दि.८ रोजी अंबाजोगाई येथे कोरोना (Corona) पॉझिटीव्ह आल्याने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल होती. तिच्या वर चार दिवस १२ तास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज दि.१३ रोजी पहाटे १ वाजून १५ मिनिटाला तिचे निधन झाले. तालुक्यातून कोविड-१९ (Covid-19) लागण होवून मृत (Death) पावणारी ती १८ वी ठरली. तालुक्यात आजपर्यंत ६२९ जनांना कोविड-१९ (Covid-19) ची लागण झाल्याची नोंद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!