कोरोंना विशेष

कोरोनाचा वाढदिवस…. अशी आहे आजची स्थिती

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) काल पासून सोशल मेडियावर social media कोरोनाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या संदेशाची धूम सुरु असून कोरोनावर आता राज्यात विजय मिळत असल्याचे दिसत आहे. आज धारुर तालुक्यात केवळ २ ॲन्टीजन Antigen चाचण्या झाल्या. जे निगेटिव्ह Negative आले आहेत, तर काल पाठवलेले एका स्वॅबचा Swab अहवालही निगेटिव्ह Negative आला आहे.

चीनच्या वुहानमध्ये दि.१७ नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा corona पहिला रुग्ण आढळला होता. बघता बघता एक वर्ष उलटलेल्या या रोगाचा वाढदिवस सोशल मेडियात social media नेटकरी साजरा करत आहेत. संपुर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनावर corona भारताने मात केली. भारतात फेब्रुवारी २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. तब्बल आठ महिने लोकांच्या मनात भिती केलेल्या कोरोनावर विजय मिळवण्यात यश येत आहे. आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातही रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाली आहे. आज बीड जिल्ह्याची आकडेवारी समाधानकारक जाहिर झाल्यावर धारुर तालुकाही निरंक आहे. येथील कोविड covid-19 केअर सेंटरवर केवळ दोन ॲन्टीजन Antigen तपासण्या करण्यात आल्या तर १४ जनांचे स्वॅब Swab नमुने तपासणीला पाठवल्याची माहिती डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!