राज्यात तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्र्यांची उद्या सर्वपक्षीय बैठक.

मुंबई दि.9 एप्रिल – राज्यातील सध्याची कोविड परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल’, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vaddetiwar) यांनी सांगितलं.
(The possibility of a three-week severe lockdown in the state; All party meeting of the Chief Minister tomorrow.)
राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून जनतेसाठी ही चिंतेची बाब आहे. आज रात्री पासुन दोन दिवसांचा कडक विकेंड लॉकडाऊन (lockdown) होत आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असली आणि ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोना काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाऊन (lockdown) करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.
उद्या बोलावण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या सर्वपक्षीय बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता लक्ष लागून आहे.
दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी सध्याच्या कडक निर्बंधांना विरोध होत आहे. परंतू राज्याच्या स्थितीबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vaddetiwar) यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल’, असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.