पुणे: दि.९- परळीच्या २२ वर्षीय तरुणीने वानवडीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. पुजा चव्हाण (Pooja Chavan) असं या तरुणीचं नाव आहे. ती मागच्याच महिन्यात इंग्लिश स्पोकश क्लासेससाठी पुणे (Pune) येथे आली होती. या आत्महत्येमुळे मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात असून आत्महत्येचे नेमके कारण पोलिस (Police) तपासानंतरच निष्पन्न होणार आहे.
पुजा चव्हाण (Pooja Chavan) तिचा चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. तिनं बीए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून पुण्यात ती स्पोकन इंग्लिशच्या कोर्ससाठी आली होती. यानंतर पुण्यात (Pune) येऊन दोनच आठवडे होत नाहीत तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. पुजाने आत्महत्या (Suicide) का केली? याचं कारण अद्याप समजलेलं नाही. वानवडी पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास घेत आहेत. तरुणीकडे कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. नागरिकांमधून ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.