आघाडी सरकारचे चौथे मंत्री कोरोना पॉझिटीव्ह !

मुंबईः राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज त्यांनी स्वतः ट्विट करुन सांगितले असून शेख हे कोरोनाची लागण होणारे राज्यातील चौथे कॕबिनेट मंत्री आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट होत असुन सर्वसामान्या पासुन उच्च पदस्थापर्यंत कोरोना लागण होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील आघाडी शासनातील जितेंद्र आव्हाड, आशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांच्या नंतर कोरोनाग्रस्त होणारे असलम शेख हे चौथे कॕबिनेट मंत्री टरले आहेत. शेख हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मलाड येथील आमदार आहेत. राज्याच्या वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री आहेत. मंत्री शेख यांनी मी कोरोना पॉझिटीव्ह असून मला सध्या कसलेही लक्षणे नसुन मी स्वतः ला कोरोंटाईन केले असल्याचे सांगत माझ्या संपर्कात आलेल्यानी स्वतः ची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. मी सध्या राज्यातील लोकांच्या सेवेसाठी घरातून काम पाहणार असल्याचेही त्यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.