शैक्षणिक

शिक्षण क्षेत्रातील उगवता तारा कोरोनाने हिरावला; चाटे पब्लिक स्कुलचे संचालक प्रा.भालेकर यांचे निधन.

किल्लेधारूर  दि.9 एप्रिल – अंबाजोगाई येथील चाटे पब्लिक स्कुलचे (Chate Public School) संचालक प्रा. चंद्रकांत भालेकर (46) यांचे कोरोनामुळे औरंगाबाद येथे  मुकुंदवाडीत एका खाजगी  रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. प्रा.भालेकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील उगवता तारा कोरोनाने हिरावून नेल्याची प्रतिक्रिया येत आहेत. धारुर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(The rising star in the field of education was defeated by Corona; Director of Chate Public School Prof. Bhalekar passed away.)

मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रा.चंद्रकांत बन्सी भालेकर (Chandraknt Bhalekar) हे काही दिवसांपुर्वी कोरोना बाधित (Corona Positive) झाले होते. यानंतर त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, औरंगाबाद येथे बेड शिल्लक नसल्याने त्यांनी अंगावर दुखणे काढत कोरोनाला गांभिर्याने घेतले नसल्याचे कळाले. अखेर काल गुरुवारी रुग्णालयात उपचार सुरु असताना  त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुलं, तीन भाऊ, बहिण असा परिवार आहे. अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरारी घेत नावलौकिक मिळवला होता.

हलाखीच्या परिस्थितीवर मात
प्रा.चंद्रकांत बन्सी भालेकर (Chandraknt Bhalekar) (रा. तांबवा ता. केज) जिल्हा बीड एका छोट्याशा गावांत जन्म झाला. त्यांना तीन भाऊ व एक बहीण असा परिवार आई वडील शेती करून मुलांना शिकवलं. चंद्रकांत भालेकर (Chate Public School) यांनी आपले प्राथमिक शिक्षण तांबवा गावात पूर्ण केले. घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे तांबवा ते धारुर असा पायी प्रवास करुन त्यांनी आपले माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण धारूर येथे पुर्ण केले. धारुर येथील जि.प. शाळेत दहावीपर्यंत तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बी.एस.सी. पूर्ण करून बी. एड. केले.

आपल्याच गावातील तांबवा येथील नामवंत चाटे कोचिंग क्लास औरंगाबाद या ठिकाणी प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, प्रा. संजय चाटे यांनी प्रा.चंद्रकांत भालेकर यांना संधी दिली. या संधीचं त्यांनी सोनं केलं प्रथम त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम चाटे कोचिंग क्लासेस सिडको औरंगाबाद येथे केले. त्यांचे काम पाहून पूर्ण महाराष्ट्र मध्ये चाटे नोट्स विभागाचे प्रमुख म्हणुन काम केले. त्यांची मेहनत पाहून त्यांना संचालक पदी चाटे परिवारात घेतले. त्यांचा विवाह चोरंबा येथील कै. अनुरोध चव्हाण पोस्टमास्तर यांच्या मुलीशी झाला.

चाटे कोचिंग क्लासेस मध्ये काम करत असताना आपण काहीतरी करून दाखवायचे या जिद्दीने चाटे कोचिंग क्लास मध्ये आलेले अनुभव च्या जोरावर त्यांनी अंबेजोगाई याठिकाणी शिक्षण संस्था काढली. अंबाजोगाई येथील चाटे पब्लिक स्कुलच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधित शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवला. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून धारूर, माजलगाव, आंबेजोगाई, केज, परळी येथील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम प्रा. चंद्रकांत भालेकर यांनी केले.

प्रा. भालेकर यांच्या अचानक निघून जाण्याने त्यांच्या परिवारावर मोठे दुःख कोसळले आहे. धारूर परिसरातील शिक्षण प्रेमी, विद्यार्थी, पालक व नागरिकांत त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनिय कामामुळे शिक्षण क्षेत्रातील उगवता तारा कोरोनाने हिरावून नेल्याची प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून शनिवारी चोरांबा येथे सावडण्याचा कार्यक्रम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!