बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचाही धोका वाढला; 8 बळी.

बीड दि.27 मे – कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच बीड (Beed) जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याचे दिसुन येत आहे. या आजाराची जिल्ह्यात आतापर्यंत 74 रुग्णांना लागण झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांवर बीडच्या शासकीय रुग्णालयासह, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

(The risk of myocardial infarction also increased in Beed district; 8 victims.)

जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित (Corona Positive) होवून बरे झालेले 74 रुग्णांना म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचे (Black fungus) प्रमाण दिसून आले. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोळ्याबरोबरच तोंडातही बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

या आजाराबाबत आरोग्य प्रशासन सतर्कता बाळगत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या रुग्णांना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) होण्याच्या कारणांचा अभ्यास केला असता यामध्ये मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

एकूण 74 पैकी 68 रुग्णांना मधुमेह असल्याची बाब विश्लेषणातून समोर आली आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान यापैकी 56 रुग्णांवर स्टेरॉईड औषधीचा वापर केला होता. कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्यानंतर शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने 29 रुग्णांना कृत्रिम प्राणवायू लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) निदान झाले.

रुग्ण वाढत असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात वेळीच निदान व योग्य उपचारामुळे अकरा जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली आहे. काही रुग्णांवर शस्त्रक्रियाकरण्यात आल्या असून सध्या 55 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आठ बळी
कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यावर मात करून मृत्यूला परतवणारे आठ रुग्ण कोरोनापश्चात म्युकरमायकोसिसचे (Black fungus) बळी ठरले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. बुधवारी बीड जिल्ह्यात 703 बाधित रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!