दुकान उघडायला निघालेल्या भावंडाना भरधाव ट्रकने चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू… सकाळी घडली घटना.

जिंतूर दि.24 जानेवारी – स्वतःच्या दुकानावर जात असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकल वर येणाऱ्या तीन युवकांना चिरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला मृतात दोन सख्ख्या भावांचा तर एका चुलत भावाचा समावेश आहे ही घटना आज सोमवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास जिंतुर तालुक्यातील अकोली जवळ घडली.

(The siblings who were about to open the shop were crushed by the truck; All three died on the spot … The incident happened in the morning.)

जिंतूर (Jintoor) पासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली गावाच्या पुलाजवळ हा अपघात सकाळी दहाच्या सुमारास घडला. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (वय 18), योगेश काशिनाथ म्हेत्रे (वय 15), रामप्रसाद विश्वनाथ म्हेत्रे (वय 20) वर्ष यांचा या अपघातात (Accident) मृत्यू झाला. हे तिघे भाजीमंडीमध्ये असणाऱ्या किराणा दुकानावर बसण्यासाठी मालेगाव या मूळ गावाहून जिंतूर कडे मोटरसायकलने (क्र. एम एस 26- 2834) येत होते.

यावेळी समोरून येणाऱ्या ट्रक (truck) क्रमांक एम एच-18 -बि जि 6270 ने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की या तीन युवकांच्या जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अपघातस्थळी हाडामासाचा सडा पडला होता. अपघातानंतर अकोली गावातील नागरिकांनी या संदर्भातली माहिती जिंतूर (Jintur) पोलिसांना (Police) दिली.

दरम्यान घटनास्थळाला पोलीस निरीक्षक (Police Inspector) दिपक शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गायकवाड यांनी भेट दिली. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतले. मयत युवक अगदी विशीतील असल्याने जिंतूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

खड्डा चुकवताना अपघात झाल्याचा अंदाज?
अकोली जवळील पुलाजवळ मोठा खड्डा आहे. हा खड्डा चुकवताना हे मोटर सायकल स्वाराचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने पडले असावेत व भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.

तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक (Speed breaker) टाकण्यात आले असून याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार हेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!