मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फेसबुक लाईव्ह; करणार लॉकडाऊनची घोषणा.

मुंबई दि.13 एप्रिल- कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) हाच प्रभावी उपाय म्हणून चर्चिला जात आहे. राज्यात लॉकडाऊनची तयारी पूर्ण झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) थोड्याच वेळात रात्री 8.30 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) राज्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यात मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत मोठी घोषणा करणार आहेत.

(Chief Minister Uddhav Thackeray Facebook Live shortly; Will announce the lockdown.)

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सध्या आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणी येत आहेत. गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे परिणामी यावर उपाय म्हणून कडक लॉकडाऊन (lockdown) करण्यात येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यांवर कडक निर्बंध लावण्यात येतील. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊनबाबत अनेक संभ्रम आहेत. एकीकडे लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध आहे तर लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचा एक मतप्रवाह आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णांना बेड आणि उपचारही मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली होती.

दरम्यान, आज सकाळीच आज मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करतील असे मंत्री असलम शेख यांनी म्हटले होते. तर लॉकडाऊन जाहिर करताना दोन दिवसांचा अवधी मिळणार असल्याचे वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले होते. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फेसबुक लाईव्ह च्या (facebook live) माध्यमातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!