कोरोंना विशेष

नवीन व्हेरिएंटचा फैलाव, निर्बंध लागू होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत.

पुणे दि.27 नोव्हेंबर –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona outbreak) कमी झाला असला तरी परिस्थिती अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आज आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा (New variant) फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेणार आहेत. काही बंधनं आणावी लागतील, अशी स्थिती आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. यामुळे पुन्हा निर्बंध (restrictions) लागू होण्याचे संकेत येत आहेत.

(The spread of new variants, the possibility of restrictions being imposed; Indications of Deputy Chief Minister Ajit Pawar.)

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. (new variant) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या नव्या व्हेरियंटला ओमिक्रॉन असे नाव दिले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊनची (lockdown) भीती व्यक्त होत आहे. आता भारतातही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची व्हीसीद्वारे बैठक बोलावली आहे.

दरम्यान, कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी 50 टक्केच बंधन हटवण्यात आले आहे. शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश (GR) काढलेला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार यांनी यावेळी दिली.

पुणे (Pune) तसेच पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर (Jumbo covid center) तसेच ठेवणार आहोत. 31 डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवला नियमांचे पालन करून परवानगी देण्यात आली आहे. तर सिनेमा आणि नाट्यगृहची संख्येची मर्यादा असणार नाही, असे ते म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!