कोरोंना विशेष

राज्याला सोमवारी मिळाला मोठा दिलासा; रुग्ण संख्येत मोठी घट तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली.

मुंबई दि.27 एप्रिल – महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात मागिल काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दिवसाला 60 हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद दररोज होत आहे. पण आता कडक लॉकडाऊनचा चांगला परिणाम सोमवारी आलेल्या आकडेवारीवरुन दिसत आहे. सोमवारी मुंबईसह राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसुन आले आहे.

(The state received great relief on Monday; While the number of patients declined sharply, the number of those who recovered increased)

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात (Maharashtra) 48 हजार 700 नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले असून 524 जणांच्या मृत्यू (Corona Death) नोंद झाली आहे. तर 71 हजार 736 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.

आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 43 लाख 43 हजार 727 वर पोहोचली आहे.
यापैकी आतापर्यंत 65 हजार 284 रुग्ण मृत्यूमुखी (Corona Death) पडले असून 36 लाख 1 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 6 लाख 74 हजार 770 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 59 लाख 72 हजार 18 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 43 लाख 43 हजार 727 (16.72 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39 लाख 78 हजार 420 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 30 हजार 398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!