कोरोंना विशेष

जनजीवन पुर्वपदावर येताच राज्याची चिंता वाढली; 24 तासात मृत्यूसह बाधितांची संख्या वाढली.

मुंबई 26 ऑगस्ट – राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Second wave) ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, लोकल सेवा सुरू झाली आहे. रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात असलेली कोरोना बाधित ( corona patients) रुग्णांची संख्या बुधवारी अचानक वाढली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू (corona death) झाला आहे. तर नवी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे.

(The state’s concern grew as soon as public life returned to normal; The number of victims increased with death in 24 hours.)

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या 24 तासांतील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 5031 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही रुग्ण संख्या 4 हजाराच्या घरात होती. पण, आता अचानक त्यात वाढ झाली आहे. तर 216 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (corona death) झाला आहे.

मृत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी ही संख्या 105 इतकी होती. बुधवारी दुपट्टीने वाढ झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा 2.12 टक्के इतका झाला आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. बुधवारी 4,380 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.07 टक्के इतके आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या पुन्हा 50 हजाराच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोविड विषाणू Corona virus) जनुकीय सूत्र निर्धारण करणाऱ्या (genome sequencing) मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. कोविड चाचणीच्या 188 नमुन्यांमध्ये सर्वाधिक 128 रुग्ण डेल्टा विषाणूचे (delta variant)  आहेत. अल्फा 2, केपा 24, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू आढळले असल्याचं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे आकडे सांगत असले तरी साथ संपलेली नाही. कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं नागरिकांनी कठोर पालन करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!