अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीत 11 मृत्यूमुखी; कोरोनारुग्णांवर काळाचा घाला.

अहमदनगर दि.7 नोव्हेंबर – अहमदनगर (Ahemadnagar) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागातील कक्षाला (Intensive care unit) काल शनिवारी (दि.6) सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोरोनावर उपचार घेणाऱ्या 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
(11 killed in Ahmednagar district hospital fire; Apply black on coronary arteries.)
राज्य सरकारकडून गतवर्षी कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग (ICU) सुरू करण्यात आली. अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आले होते. या कक्षात 17 रुग्ण उपचार घेत होते. दि.6 शनिवारी या कक्षात अचानक आगीचे लोट पाहून रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली. कर्मचारी व नातेवाईकांनी रुग्णांना बाहेर काढण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत रुग्ण भाजून गंभीर जखमी झाले होते.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने (Fire brigade) तात्काळ आग विझवली. आगीत भाजलेल्या रुग्णांना कक्षातून जवळच असलेल्या प्रसूती कक्षात हलविण्यात आले. या आगीत व्हेंटिलेटर (Ventilator) व ऑक्सिजनवर (Oxygen) असलेले रुग्ण जळून खाक झाले. रुग्णांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱ्यांची समिती चौकशी करेल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख- राजेश टोपे
अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत.
– राजेश टोपे (Rajesh Tope), आरोग्यमंत्री
मुख्यमंत्र्यांकडून शोक
आगीच्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.