बेळगावात राडा…. आघाडी सरकारमधील मंत्र्यांनीही पाळला काळा दिन

बेळगाव :- 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक Karnataka सरकारने एकीकरण समितीला याबाबत परवानगी नाकारली आहे. कर्नाटक Karnataka सरकारचं फर्मान झुगारुन बेळगावात Belgoan महाराष्ट्र एकिकरण समितीने काळा दिन पाळत निषेध नोंदवला असुन पोलिसांनी Police अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आज काळा दिन धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी दमदाटी केली. बेळगाव Belgoan हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव Belgoan येथे केलं होतं. सवदी यांच्या वक्तव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख उत्तर दिलं आहे. चंद्र-सूर्य नाही तर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावरून खाली होण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात घेऊ असं प्रति आव्हान हसन मुश्रीफ यांनी सवदी यांना दिलं. 1956 साली राज्य पुनर्रचना झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत असून त्या दिवशी मराठी भाषिक फेरी काढतात. यावर्षी मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींनी हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरवात केली. दरम्यान बेळगावमधील मराठी भाषिकांच्या निषेध मेळाव्याला सुरुवात करत कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत कर्नाटक Karnataka Police पोलिसांनी काळे कपडे न घालण्याचे आदेश धुडकावले. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!