कोरोंना विशेष

कोरोनाची तिसरी लाट… जागतिक आरोग्य संघटना व एम्सचा महत्वपूर्ण अहवाल.

नवी दिल्ली दि.18 जून – महाराष्ट्रासह देशभरात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृत्यू दर जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारी वरुन स्पष्ट झाले आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (Third wave of corona) अनेक तर्क वितर्क लावले जात असून ही लाट लहान बालकांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. मात्र नुकताच जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि दिल्लीच्या एम्सचा अहवाल समोर आला असून यात दिलासादायक माहिती मिळाली आहे.

(The third wave of corona, the important report of the World Health Organization and AIIMS.)

दुसरी लाट ओसरली असली तरी मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) लहान मुलांसाठी सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यादृष्टीनं अनेक राज्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लहान मुलांसाठीचे बेड्स, त्यांच्यासाठीच्या वेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा (AIIMS) एक अहवाल समोर आला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि एम्सनं केलेल्या सीरो सर्वेक्षणातील आकडेवारी दिलासा देणारी आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना वयस्करांच्या तुलनेत अधिक धोका नसेल, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांमधील SARS-CoV-2 सीरो पॉझिटिव्हिटी रेट (Sero positivity rate) जास्त असल्याचं सर्वेक्षण (Survey) सांगतं. देशाच्या 5 राज्यांमधील 10 हजार व्यक्तींचा सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्वेतील अंतरिम आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. तर अंतिम आकडेवारी लवकरच अपेक्षित आहे.

एम्स (AIIMS) दिल्लीचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. पुनीत मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली सीरो सर्वेक्षण (Survey) करण्यात आलं. त्यानुसार दक्षिण दिल्लीतल्या शहरी भागांमध्ये असलेल्या रिसेटलमेंट वसाहतींमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त (74.7 टक्के) होता. या वसाहतीत लोकसंख्येची घनता अधिक आहे. जास्त पॉझिटिव्हिटी रेटचा अर्थ बहुतांश लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रतिकार करू शकणाऱ्या अँटिबॉडी तयार झाल्या आहेत असा होतो. दुसऱ्या लाटेच्या आधीही दक्षिण दिल्लीत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट (Sero positivity rate) खूप जास्त होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!