पुन्हा ‘बर्निंग बस’चा थरार

इगतपुरी: दि.१३- मुंबई- नाशिक महामार्गावर मंगळवारी ‘बर्निंग बस’ (Burning Bus) चे थरारक दृश्य पाहायला मिळाले. धावत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. अंगावर काटा आणणारे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही दिवसांपुर्वीच जिंतूरमध्ये असाच प्रकार रस्त्यावर  घडला होता.

मुंबई- नाशिक महामार्गावरील वाडीवऱ्हेच्या पुढे आठवा मैल शिवारात मंगळवारी धावत्या लक्झरी बसमध्ये तांत्रिक शॉर्टसर्किट झाले. यामुळे लक्झरी बसने (यूपी (UP) ६५, ईटी ०१०१) पेट घेतला. ही बस मुंबईहून उत्तर प्रदेशकडे (UP) जात होती. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीत बस पूर्णपणे खाक झाली. सुदैवाने यात केवळ दोनच प्रवासी प्रवास करीत होते. बसला मागच्या बाजूने आग लागताच चालकाने प्रसंगवधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण वाहतूक शाखा व वाडीवऱ्हे पोलिस (Police) पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांची गर्दी बाजूला केली. अग्निशमन दलाचा बंब बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत बस (Burning Bus) पूर्णपणे खाक झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!