केज तालुक्यात रोड रॉबरी; रेणापुरच्या कुटूंबाला मारहाण करुन लुटले.

केज दि.7 मे – केज तालुक्यातील मस्साजोग शिवारात शनिवारी पहाटे गाडी अडवून गाडीच्या चालकासह इतर दोघांना मारहाण करत दागिने व रोकड असा 74 हजारांचा ऐवज लंपास (Road Robbery) केल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलीसांत (Police) 7 ते 8 अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेणापूर (Renapur) तालुक्यातील निवाडा येथील लक्ष्मीकांत विश्वनाथअप्पा उरगुंडे हे एक कार्यक्रम आटोपून आज पहाटे (दि.7) रोजी कुटुंबासह केज बीड (Kaij Beed) रस्त्याने गावाकडे परत निघाले होते. दरम्यान, त्यांची गाडी केज तालुक्यातील मस्साजोग शिवारात पिंपळगाव पाटीजवळ पहाटे चार वाजता आली.
रस्त्यावर त्यांना लोखंडी जॅक दिसून आल्यामुळे उरगुंडे यांच्या चालकाने गाडी थांबवली. मात्र त्याचवेळी दबा धरून बसलेल्या 7 ते 8 अज्ञात चोरट्यांनी गाडी चालकाला बाजूच्या शेतात नेऊन मारहाण केली. यानंतर गाडीतील इतर प्रवासी खाली उतरले. चोरट्यांनी त्यांनाही काठीने मारहाण करून पैसे और सोना दे दो म्हणत पंचवीस हजारांचे दागिने व 49 हजार नगदी असा एकूण 74 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग (National Highway) असलेल्या रस्त्यावर घडलेल्या सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसपी पंकज कुमावत (ACP Pankaj Kumawat) व कविता नेरकर यांनी केज पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. प्रकरणाचे गांभिर्य जाणून तपासा बाबत तपास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे हे करत आहेत.
( Road Robbery in Kaij Taluka; Renapur’s family was beaten and looted. )