‘त्या’ भीषण अपघातात आई लेकरांसह एकाच कुटूंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत…. मद्यपी ड्रायव्हरमुळे घडला तिहेरी अपघात

बीड दि.8 मार्च – बीड (Beed) पासून 4 कि.मी. अंतरावर असलेल्या पांगर बावडी येथे भरधाव ट्रकने रिक्षाला चिरडल्याची घटना सांयकाळी सव्वासात वाजता घडली. या अपघातात (Accident) एकाच कुटूंबातील माय लेकरांसह 5 जणांचा मृत्यू (killed) झाला. मद्यपी ड्रायव्हरने केवळ रिक्षाच नव्हे तर घोडका राजुरीजवळ एका पीकअपला व दुचाकीलाही धडक देत ट्रक ड्रायव्हर फरार झाला.
The unfortunate end of 5 members of the same family including mother and children in 'that' horrible accident .... triple accident due to drunk driver
वडवणीहून बीडकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षाला बीड (Beed) जवळ पांगर बावडी येथे भरधाव ट्रकने (क्र.एम.एच. 09-सी.व्हि. 9644) सव्वासातच्या सुमारास चिरडले (truck crushed auto rickshaw). मद्यधूंद अवस्थेत असलेल्या ट्रक ड्रायव्हरने तसाच ट्रक पुढे नेत घोडका राजुरीजवळ एका पीकअप व दुचाकीला धडक दिली. यानंतर ट्रक पलटी होवून ड्रायव्हर मात्र फरार झाला. या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी आहेत.
अपघातात (Accident) बीड येथील शाहुनगर भागातील पठाण कुटूंबियांवर काळाने घाला घातला. मयतात मायलेकरांचा समावेश आहे. तब्बसुम अजमल पठाण व रिहान अजमल पठाण (8) व तमन्ना अजमल पठाण (10) अशी त्यांची नावे आहेत. इतर मृतात शारो सत्तार पठाण, मदिना अकबर पठाण यांचा समावेश आहे. अपघातातील मयत एकाच कुटूंबातील आहेत. यात तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
तिहेरी अपघातात जखमी झालेल्यात ॲपेरिक्षा चालक सिध्दार्थ शिंदे, जाईबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी पोकळे आणि गोरख खरमाडे व इतर दोन यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेनंतर डॉ. मनोज घडसिंग, डॉ. अभिषेक जाधव, डॉ. संदीप पाटील आणि डिएमओ डॉ. मुंडे यांनी तातडीने उपचार केले.