मतदान करतानाचा व्हिडीओ वायरल करणे आले अंगलट…..

कळंब: दि.१(प्रतिनिधी) पदवीधर मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानावेळी केंद्रात मोबाईल (Mobile) नेऊन मतदानाचा व्हिडिओ करत तो सोशल मेडियात वायरल केला. सदरील प्रकार कळंब येथे दुपारी समोर आला असून याप्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 72 केंद्रावरून मतदान (Voting) प्रक्रिया सुरू आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात 20 टक्के मतदान शांततेत झाले आहे. दरम्यान, मतदान (Voting) केंद्रावर मोबाईल (Mobile) किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास प्रतिबंध असताना कळंब येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने मोबाईल नेऊन मतदानाचा व्हिडीओ (Video)  तयार केल्याचा प्रकार घडला. तरुणाने हा व्हिडीओ (Video) समाजमाध्यमात व्हायरल केल्याने प्रकार उघडकीस आला. सदरील व्हायरल व्हिडीओची तक्रार उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकाराची दखल घेत तातडीने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे निर्देश कळंब येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!