धारुर, वडवणी व परळीतील गावे भयभीत; भुगर्भातील आवाजाची शृंखला सुरुच.

बीड दि.2 अॉक्टोंबर – बीड (Beed) जिल्ह्यातील चार तालुक्यात भूगर्भातून येणाऱ्या आवाजामुळे (Mysterious voice) जनता भयभीत आहे. अंबाजोगाई, धारुर (Dharur) नंतर आता वडवणी (Vadvani) व परळी (Parli) तालुक्यातील गावातही भुगर्भातून आवाज येत असून या गावातील लोक आवाजामुळे मोठ्या प्रमाणात भयभीत झाली आहेत.

(The villages of Dharur, Vadvani and Parli are terrified; The series of underground sounds continues.)

विशेषतः रात्री होणाऱ्या आवाजामुळे ग्रामस्थ अक्षरशः रात्र जागून काढत आहेत. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी तर बुधवारी धारूर तालुक्यातील आवरगाव येथे भुगर्मातून आवाज येत असल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी परळी तालुक्यातील लाडझरी येथे व वडवणी तालुक्यात पिंपळटक्का येथेही भूगर्भातून मोठे आवाज ऐकायला मिळत आहेत. यामुळे या गावातील ग्रामस्थ भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

भीतीपोटी गावकऱ्यांचं स्थलांतर
गेल्या चार दिवसांपासून भूगर्भातून असे भयंकर मोठे आवाज येत आहेत त्यामुळे लोक भयभीत झालेल आहेत. आवाज येत असल्यानं आवरगाव, लाडझरी व पिंपळटक्का गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. परळी तालुक्यातील लाडझरी गावातील ग्रामस्थ रानात स्थलांतरीत झाले आहेत. तर, काही ग्रामस्थ पाहुण्यांकडे निघून गेले आहेत. गावकऱ्यांनी भूगर्भ तज्ज्ञांना (Geologists) बोलावून नक्की काय घडतंय याचा शोध प्रशासनानं घ्यावा, अशी मागणी केली आहे.

भूजल तज्ज्ञ म्हणतात
बीडच्या धारुर तालुक्यातील आवरगाव आणि परळी तालुक्यातील लाडझरी या गावात भूगर्भातून येत असलेला आवाज हा डेक्कन ट्रॅप बेसाल्ट (Deccan Trap Basalt) आवाज असल्याचे भूजल तज्ज्ञ सांगत आहेत. भूस्तरातील पोकळीमध्ये पावसानंतर भूजल व हवेची पोकळी यामधील परस्परक्रिया घडून येत असल्याने त्यावेळी आवाज ऐकायला येतात असं भूजल तज्ञांनी सांगितले आहे.

अतिवृष्टीच्या आणि मुसळधार पावसाच्या (rain) अस्मानी संकटानंतर आता बीडमधील (Beed) पिंपळ टक्का या डोंगरातील गावासह आवरगाव, लाडझरी गावात भूगर्भातील गुढ आवाजामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. भूकंपाच्या (Earthquake) भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत. भूगर्भातील हालचालीमुळे असे आवाज होऊ शकतात, असं भूगर्भ तज्ञ यांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र आवाजचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!