बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.18 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 4483 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 156 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4327  जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत किंचित वाढ दिसुन येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-40, अंबाजोगाई-10, आष्टी-27, धारुर-4, गेवराई-12, केज-17, माजलगाव-3, परळी-11, पाटोदा-17, शिरुर-7, वडवणी-8 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत गेल्या काही दिवसात किंचित वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे चिंतेत भर पढत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कोरोना विषयक आढावा घेतला.

दरम्यान,  गेल्या 24 तासांत राज्यांत 9 हजार 830 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 236 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 5 हजार 890 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 85 हजार 636 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण 1 लाख 39 हजार 960 इतकी आहे.

राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 5 हजार 890 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 95.64 टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या 24 तासांत राज्यांत एकूण 9 हजार 830 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!