पहा लॉकडाऊन मधील गाईडलाईन्स …. असा असेल बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन

बीड दि.24 मार्च- जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रेस नोटच्या माध्यमातून पुढील सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून दिनांक 20.03.2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्याटप्प्याने सदरचे लॉकडाऊन दिनांक 22.03.2020 पासून लॉकडाऊन (lockdown) घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्याटप्प्याने सदरचे लॉकडाऊन दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे.
(See the guidelines in lockdown …. this will be the lockdown in Beed district)

कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव व प्रसार टाळण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144(1)(3) नुसार बीड जिल्ह्यात मनाई आदेश (लॉकडाऊन) लागू करीत आहे.  नगरपरिषद/नगरपंचायत/ग्रामीण क्षेत्राकरीता परिशिष्ट परिशिष्ठ अ, ब प्रमाणे सूचना (guidelines) निर्गमित केल्या आहेत.

बीड जिल्ह्यात (दिनांक 25.03.2021 च्या मध्यरात्रीपासून) दिनांक 26.03.2021 चे 00.00 ते दिनांक 04.04.2021 चे 24.00 वाजेपर्यत बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असेल.

1.सार्वजनिक/खाजगी क्रिडांगणे/मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील.
2.उपहारगृह, सर्व अनुज्ञप्त्या, रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. (कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण, नाष्टा, चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून)
3.सर्व केशकर्तनालय/सलुन/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णत: बंद राहतील.

4.शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील.
5.सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील.  तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. सोबत ओळखपत्र/पुर्व परवानगी/वैद्यकिय कारण असेल तर त्यासंबंधीचा पुरावा.

6.सार्वजनिक व खाजगी बस सेवा,ट्रक,टेम्पो, ट्रेलर,ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णत: बंद राहतील. तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायत चे , पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत.

7.सर्व प्रकारचे बांधकाम/कंन्स्ट्रक्शनची कामे संपूर्णत: बंद राहतील. तथापि शासकीय बांधकामे चालू राहतील. त्याठिकाणी काम करणा-या कामगार यांना संबंधित शाखा अभियंता, यांनी तात्पुरते पास उपलब्ध करून देण बंधनकार असेल.
8.सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृह संपूर्णत: बंद राहतील.

9.मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णत: बंद राहतील.
10.सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णत: बंद राहतील.
11.धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णत: बंद राहतील.
12.बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये संपूर्णत: बंद राहतील. परंतु 31 मार्च 2021 अखेरीस ताळमेळ, बॅकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल. (दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगचे कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल.)

1.सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी 07.00 ते 09.00 वाजेपर्यत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना 07.00 ते 09.00 या वेळेतच केवळ दुकानातुन घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.
2.दुध विक्री व वितरण सकाळी 10.00 वाजेपर्यत घरपोच अनुज्ञेय राहील.तथापि दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.संबंधित दुध विक्रेता व वितरक यांनी अन्टीजन/आरटीपीसीआर केलेली असणे बंधनकारक असेल.
3.भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 07.00 ते 10.00 या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!