अखेर प्रतीक्षा संपणार … बहुचर्चित “मजनू” चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख लवकरच होणार जाहीर ….

पुणे दि.25 एप्रिल – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला चित्रपट ‘मजनू’ (Majanu) लवकरच प्रदर्शित होणार असल्याची प्रतिक्रिया चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी दिली आहे.
मजनू म्हणजे फार काही तरी वेगळं आणि हटके पाहायला भेटणार आहे असं देखील त्यांचं म्हणणं आलं. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता रोहन पाटील , लागीर झालं जी फेम आज्या उर्फ नितीश चव्हाण , स्वेतलाना अहिरे , मिलिंद शिंदे , सुरेश विश्वकर्मा ,अदिती सारंगधर , माधवी जुवेकर , भक्ती चव्हाण , अरबाज शेख , प्रणव रावराणे एवढे कलाकार दिसणार आहेत , आणि हा चित्रपट नक्कीच अनेक रेकॉर्ड ब्रेक (Record Break) करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांत हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स अॉफीसवर (Box Office) धूम ठोकली आहे. पुष्पानंतर आरआरआर या चित्रपटांंन बाजारात सध्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचली आहे. यातच मराठी चित्रपट ‘मजनू’ला प्रेक्षकांची पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच मजनू ची प्रदर्शनाची तारीख जाहिर होत आहे.
( The wait is finally over … The release date of the much talked about movie “Majnu” will be announced soon …. )