पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोडचे परळीतील घर चोरट्यांनी फोडले….

परळीः दि.१५(प्रतिनिधी)- परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील अरुण सुभाष राठोड (Arun Rathod) या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील (Pooja Chavan suicide case) संशयिताच्या घरी रविवारी रात्री चोरट्यांनी चोरी केली असून त्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी (Police) भेट दिली असून सोमवार दुपारपर्यंत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan suicide case) तापून परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील अरुण राठोड (Arun Rathod) याचे नाव व्हायरल अॉडीओ क्लिपमधून समोर आले. यामुळे अरुण राठोड याचे कुटुंबीय गेल्या चार दिवसांपासून अज्ञातवासात होते. आज अरुणचे कुटूंबिय घरी आले तेव्हा घरातील कपाटातील सामान इतस्त: पसरलेले आढळून आले. या घटनेमुळे अरुणच्या कुटूंबियांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाले आहे. घटनेची माहिती कळताच परळी ग्रामीण पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे, पोलीस नाईक रामचंद्र केकान, चंद्रकांत आंबाड, बीडचे ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण त्यांचे कर्मचारी यांनी भेट दिली.