एस.टी. बस प्रवासी वाहतूक दहा दिवस राहणार बंद; जिल्ह्याच्या सिमा होणार सिल.

बीड दि.24 मार्च – बीड जिल्ह्यात दहा दिवस लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. सदरील लॉकडाऊन (lockdown) बाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्थेबाबत अनेकांना संभ्रम असून याकाळात मात्र कसल्याही स्वरुपाची वाहतूक होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सर्व एस.टी. बसेस दि.25 गुरुवारच्या मध्यरात्रीपासून दि.26 मार्च ते 4 एप्रिल या दहा दिवस बंद राहणार आहेत. जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद (boundary sealed) करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
(S.T. Bus passenger traffic will remain closed for ten days; The boundary of the district will be sealed.)
जिल्हयात कोरोना विषाणूचा (Corona virus) वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. या कालावधीत सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय बीड जिल्हयात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
बीड जिल्हयात येणाऱ्या सर्व सिमा (सिल) बंद (boundary sealed) करण्याचे निर्देश श्री. रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत. या मधून नियमानुसार न्यायिक आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मुभा देण्यात आलेल्या काहींना वगळण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणारी, किंवा आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार गुन्हा केला असे ग्राह्य धरुन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
लॉकडाऊनच्या (lockdown) दि.26 मार्च ते 4 एप्रिल या काळात एस.टी. बसची (ST Bus) चाकेही थांबणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णत: बंद राहतील. तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायतचे, पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकाही आगारातील बस (ST Bus) गुरुवार पासून रस्त्यावर दिसणार नाही. तसेच जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात येणार असल्याने बाहेर जिल्ह्यातील बसेसही दिसणार नाहीत.