हिटरमधील गरम पाणी अंगावर पडल्याने महिला भाजली तर मुलाचा मृत्यु.

गेवराई दि.6 जुलै – तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात पाहुण्याच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या अंगावर 2 जुलै रोजी रात्री हिटर (Heater) मधील गरम पाणी अंगावर पडल्याने या झालेल्या दुर्दैवी घटनेत महिला किरकोळ भाजली तर मुलगा गंभिर भाजल्याने त्याचा उपचारा दरम्यान 5 जुलै सोमवार रोजी रात्री मृत्यू झाला तर आई उपचार करून घरी आली आहे.

(The woman was burnt to death by the hot water falling on her body.)

गोरख गिज्ञानदेव काराडे (37) व सत्यभामाबाई गिज्ञानदेव काराडें वय (75) आई व मुलगा दोघे राहणार कंळसंबर ता.जि. बीड हे कामासाठी तळणेवाडी येथे आले असता जावाई विठ्ठल लक्ष्मण शेंडगे तळणेवाडी याच्या घरी 2 जुलै रोजी रात्री जेवन करून एका खोलीत झोपेले असता बाजुला असलेल्या फायबर ड्रम (Fiber drum) मध्ये हिटरमधील गरम करुण ठेवलेले पाणी झोपेत अंगावर पडल्याने यात आई किरकोळ भाजली होती. तीच्या वर बीड येथे उपचार करून घरी आनले होते.

मात्र मुलगा गंभीर भाजल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने 5 जुलै सोमवार रोजी रात्री मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गोरख काराडें मिस्त्री काम करत असल्याने मागील दिड वर्षापासुन लॉकडाऊनमुळे (lockdown) नाशिक येथे काम करत होता. मात्र सोय लागत नाही म्हणुन मिस्त्री काम करण्यासाठी तळणेवाडी येथे आला होता.

सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी ओघंळीसाठी गरम पाणी करण्यासाठी गेले हिटर (Heater) पाणी अधिक प्रमाणात तापल्याने फायबर ड्रम (Fiber drum) पघळून खाली कलवडंले व जवळच झोपेत असलेल्या मायलेकराच्या अंगावर पडले होते. आई किरकोळ भाजली तर मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. या घटने मुळे गावात शोककळा पसरली असुन गोरख कारडेंच्या पश्चात आई,पत्नी, एक भाऊ,एक मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!