कोरोंना विशेष

धारुरमध्ये आजही आढळले येवढे कोरोना रुग्ण….पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) कालच्या वाढलेल्या कोरोना संख्येनंतर आजही ४ बाधित आढळले आहेत. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसह एकुण ११ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ३ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवलेल्या २८ स्वॅब (Swab) पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

दोन दिवसांपासून पॉझिटीव्ह (positive) रुग्णांचा आकडा चढता दिसत आहे. काल एसटी आगारातील ७ कर्मचारी कोरोना बाधित आढळली होती.आज कोविड केअर सेंटरमध्ये ११ ॲन्टीजन तपासण्या करण्यात आल्या. यात एका प्रकरणी न्यायालयात हजर होणाऱ्या दोन आरोपीचा समावेश होता. दोन्ही आरोपीसह एक महिला असे ३ जन पॉझिटीव्ह आढळले आहेत. काल २८ स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज १० जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ६५ वर्षीय पुरुष, आरोपी, धारुर

२. २७ वर्षीय पुरुष, आरोपी, धारुर

३. २४ वर्षीय स्त्री, पिंपरवाडा, ता. धारुर

स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण

४. ३५ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!