कोरोंना विशेष

धारुरमध्ये आज आढळले एवढे रुग्ण…..पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१७(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये ३ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला. तर काल पाठवलेल्या ७ स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान आज सांयकाळी ४.३० वाजता जिल्ह्यातील ६३ रुग्ण बरे होवून रुग्णांची सुट्टी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले.

हळूहळू जनजीवन पुर्वपदावर आले आहे. मात्र एसटी महामंडळाच्या मुंबई वारी मुळे धारुरचे मीटर सुरु आहे. शासनाने काल सोमवार पासुन धार्मिक स्थळंही खुली केली आहेत. तुरळक प्रमाणात पॉझिटीव्ह Positive रुग्ण येण्याची शृंखला सुरुच आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ३ ॲन्टीजन Antigen तपासण्या करण्यात आल्या. या ३ पैकी २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली. काल ७ स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. ती सर्व निगेटिव्ह आली आहेत. आज १ जनांचा स्वॅब (Swab) तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आला असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन Antigen तपासणीत आढळलेले रुग्ण

१. २७ वर्षीय पुरुष, हसनाबाद, ता.धारुर

२. २० वर्षीय पुरुष, सोनिमोहा, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!