पारंपारिक व्यवसाय जोपासणारे रामचंद्र कुंभार…

किल्लेधारूर दि.७(सय्यद शाकेरअली) माती कलश व उन्हाळी माट, डेरे, रांजण, सुरई बनवणारा कुंभार समाज आज अडचणीत आला आहे. दिवसेंदिवस फॕन्सी प्रकारामुळे व प्लास्टिक वस्तूंच्या वापरामुळे पारंपारिक मातीच्या वस्तूंचा वापर कमी झालेला असताना धारुर Dharur येथील रामचंद्र अंबादास कुंभार Kumbhar आजही पारंपारिक व्यवसाय जोपासत आहेत.
सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून कुंभार समाज उदरनिर्वाह करतो. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील कुंभार समाज आपला पारंपरिक गाडगी, मडकी, माठ, रांजण, गणपती, व सणासुदीला लागणाऱ्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो. या कारागीरांनी उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी लागणारे उन्हाळी माठ, रांजण व इतर वस्तू बनवून बाजारात विकतात. दसरा, दिवाळी सारखे सण कुंभार Kumbhar कारागिरांना चार पैसे कमावण्याचा हा महत्त्वाचा सीझन असतो. त्यावरच त्यांचा वर्षभर कुटुंब चरितार्थ चालतो. अचानकपणे आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशभर संकट उभारले आहे. या काळातच अक्षय तृतीया, गणपती, पोळा सारखे कुंभार समाजाच्या उत्पन्नाचे सण होवून गेले.
कुंभार समाजातील मातीच्या वस्तू विक्रीला जाणाऱ्या दिवाळी सारखा सण तोंडावर आलेला असुन पुन्हा नव्या उभारीने येथील रामचंद्र कुंभार दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, झाकणे, लोटके बनवत आहेत. धारुर Dharur शहरातील कुंभार गल्लीत अनेकांनी आपल्या पारंपारिक व्यवसायाला तिलाजंली देवून नवीन व्यवसाय स्विकारली. मात्र रामचंद्र अंबादास कुंभार यांनी आपला पारंपारिक व्यवसाय सुरुच ठेवला आहे. कुंभार Kumbhar हे सध्या मातीपासून पणत्या, झाकणे, लोटके, माठ, घागरी, चूली, रांजण, पाण्याच्या टाक्या बनवत व्यवसाय टिकवून ठेवत आहेत. आज मातीही उपलब्ध होत नाही, शासनाकडून कसलीही मदत मिळत नाही अशी खंत व्यक्त करत किमान चाकं तरी शासनाने द्यावे जेणेकरुन हा पारंपारिक व्यवसाय मी आहे तोपर्यंत जोपासता येईल अशी बोलकी प्रतिक्रिया देत शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.