कोरोंना विशेष
धारुरमध्ये आज आढळली येवढे रुग्ण….. पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज एकही ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आलेली नाही. काल पाठवलेल्या ६ स्वॅब (Swab) नमुन्यातील १ अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दि.२५ रोजी ७ ॲन्टीजन तपासणीत १ पॉझिटीव्ह (Positive) असे दोन दिवसात केवळ २ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळलेली आहेत. आज ११ संशयितांचे स्वॅब (Swab) नमुने अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन Antigen तपासणीत आढळलेले रुग्ण (दि.२५)
१. २४ वर्षीय पुरुष, उमरेवाडी, ता.धारुर
स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण (दि.२६)
२. १६ वर्षीय पुरुष, सोनिमोहा, ता.धारुर
यांचा समावेश आहे.