खूनाच्या घटनेने पुन्हा बीड हादरले… शेतीच्या वादातून 15 वर्षीय मुलाचा खून करुन ऊसात लपवले.

गेवराई दि.11 अॉगस्ट – गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी येथे 15 वर्षीय मुलाचा शेतीच्या वादातून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा खून (Murder) करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ऊसाच्या शेतात लपविण्यात आला होता. तलवाडा पोलिसांनी याप्रकरणी दि.10 अॉगस्ट मंगळवारी रात्री मुख्य आरोपीला अटक केली असून आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत.
(The murder incident shook Beed again … He killed a 15-year-old boy in a farm dispute and hid him in sugarcane.)

भेंडटाकळी तांडा येथील संदिप सोपान चव्हाण (वय 15) हा शनिवारी आपल्या शेतात एकटा गेला होता. यावेळी शेतीच्या बांधावरून संदीप चव्हाण आणि किशोर लोंढे यांच्यात वाद झाले. संदीप हा शेतात एकटा असल्याने किशोर व त्याचे साथीदार भगवान विठ्ठल लोंढे, बाळू बळीराम लोंढे, आकाश भगवान लोंढे, सोमनाथ भगवान लोंढे यांनी संगमताने संदीपचा खून करून त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात लपविला.

राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी तलवाडा पोलीस ठाण्यात (Police station) संदिप बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. नंतर पोलिसांनी (Police) तपास सुरु केला असता संदीपचा मृतेदह आरोपीच्या ऊसाच्या शेतात आढळून आला. दि.10 अॉगस्ट मंगळवारी रात्री याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या किशोर लोंढे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुभाष माने हे करीत आहे.

तलवाडा पोलीसात संदीप चव्हाण खून प्रकरणात 302 कलमाखाली पाच जणांविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नसून संदीपच्या अंगावर एकही जखम नाही. त्यामुळे त्याची हत्या कशी करण्यात आली हे अहवाल आल्यानंतर समोर येईल. दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या किशोर लोंढे याला गेवराई न्यायालयात आज दि.11 बुधवारी हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!